घेई भरारी

पाय जमिनीवर ठेवून गगनात उंच भरारी घेणाऱ्या आमच्या यशोगाथा आणि त्यासाठी दिग्गजांनी काढलेले गौरवोद्गार हे आम्हाला भविष्याचा वेध घेण्यास शक्तिवर्धक ठरतात.

चलचित्र संग्रह

दीदींचा शुभसंदेश, दीदींच्या स्वरात !

by लता मंगेशकर

बालमोहन बालदिनानिमित्त आचार्य अत्रेंचं दुर्मिळ भाषण

by प्रल्हाद केशव अत्रे

चलचित्र संग्रह

शाळेच्या आठवणी जमेल तितकं चलचित्र स्वरूपात संग्रहित करून ठेवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. पण तरीही तुमच्याकडे अशा आठवणी चलचित्र स्वरूपात असतील तर आम्हाला जरूर पाठवा आम्ही त्या इथे ठेवण्याचा निश्चित प्रयत्न करू.

संस्मरणीय पत्रं

जगभरात दोन महान व्यक्तींनी एकमेकांना लिहिलेली पत्रं ह्याला साहित्याचा दर्जा दिला गेला आहे कारण ती त्यावेळची भाषा, सामाजिक परिस्थिती आणि दोन व्यक्तींचा एकमेकांच्या बाबतीत असलेला स्नेह जिव्हाळा ह्याचं ते प्रतीक असतं. स्व. दादांना अनेकांनी पत्र लिहून त्यांना शुभेच्छा दिल्या, अनेक वेळेस दादा रेगेंनी मान्यवरांना पत्र लिहून भावना व्यक्त केल्या आहेत. आज दादा पण हयात नाहीत आणि ज्यांच्याशी पत्रव्यवहार झाला अशी अनेक व्यक्तिमत्व हयात नाहीत पण हा साहित्यिक ठेवा तुमच्यासाठी खुला करत आहोत.

यशोगाथा

एखाद्या स्पर्धेत किंवा परीक्षेत तुम्ही सर्वोत्तम ठरालच असं नाही पण सर्वोत्तम स्पर्धक म्हणून तुमची नोंद घेतली तरी पुढचा मार्ग सोपा होतो हा विचार बालमोहनमध्ये रुजवला जातो. सर्वोत्तम स्पर्धक आणि सर्वोत्तम विजयी स्पर्धक घडवण्याची बालमोहनची ही यशोगाथा…