विज्ञानासारखा विषय निसर्गातील विज्ञानाच्या आधारे शिकवला जातो तर गणितापासून भाषेपर्यंतचे विषय हे इथल्या ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलांना त्यांच्या सभोवतालच्या दररोजच्या अनुभवातून शिकवलं जातात. मुलांची इंग्रजी संभाषणाची भीती जावी म्हणून विशेष लक्ष दिलं जातं त्याशिवाय प्रत्यक्ष शेती करणं, भाजीपाल्याची लागवड शाळेच्या आवारातच केली जाते आणि ह्या आवारात पिकणाऱ्या भाज्या मुलांच्या रोजच्या जेवणाचा भाग असतात, त्यामुळे स्वावलंबन आणि श्रम हे गुण त्यांच्या अंगी नकळत बाणवले जातात.
शाळेचा परिसर
इतर कोणत्याही उत्तम शहरी शाळेत सापडतील अशा सर्व सोयी सुविधा इथे आहेत. पुस्तकांनी आणि संदर्भ ग्रंथांनी भरगच्च भरलेलं ग्रंथालय आहे, प्रयोगशाळा आहेत, ऐसपैस वर्ग आहेत, मुलांच्या जेवणातील रोजच्या भाज्या, फळं ही शाळेच्या शेतातच पिकवली जातात, मुलांना जे दूध पिण्यासाठी दिलं जातं त्या गाईंचं संगोपन शाळेच्या आवारातच होतं, शाळेतील शिक्षक हे मुलांच्या सोबत त्यांच्या वसतिगृहाच्या जवळच राहतात त्यामुळे त्यांना त्यांच्या शिक्षकांशी कधीही संवाद साधता यावा आणि या सगळ्याच्या पलीकडे अफाट पसरलेला निसर्ग मुलांच्या सोबत सदैव असतो.
रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन, यशवंत नगर, तळेगाव दाभाडे, पुणे ४१० ५०७.
© २०२२ रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन. सर्व हक्क आरक्षित.