संस्कारक्षम वातावरण
निसर्गाचा आदर राखत, आपल्याकडून त्याची नकळत हानी होऊ नये हे मुलांच्या मनावर बिंबवणं हाच खरा एकविसाव्या शतकातला आवश्यक संस्कार. हाच संस्कार आम्ही कटाक्षाने रुजवायचा प्रयत्न करतो.
संस्कारक्षम वातावरण
सध्या जगात असा एकही देश नसेल, प्रांत नसेल ज्याला हवामानबदलाचा झटका नसेल. त्यामुळे पर्यावरणपूरक जीवनशैली हवी असं प्रत्येकाला मनापासून वाटतं पण नेमकं काय करायचं ह्याबद्दल बहुतांश जणं हे अनभिज्ञ असतात. त्यात कुंडीतील रोपट्याचा पलीकडची हिरवाई आणि त्यातल्या मातीच्या स्पर्शापलीकडे मातीचा स्पर्श माहित नसल्यामुळे मग काहीशी कृत्रिमता यायला सुरुवात होते. म्हणूनच अनुभव विस्तीर्ण करणारं वातावरण शाळेत, शाळेच्या आवारात असावं हे आम्ही रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतनमध्ये पाहिलं आहे.
ह्या शाळेचा परिसरच ३० एकराचा आहे. ही प्रशस्तताच मुलांच्या मनातून कुठल्याही कोतेपणाला, क्षुद्रपणाला हद्दपार करते. शाळेच्या परिसरात झाडांची रेलचेल आहे, खरी संपत्ती कोणती आणि ती कशी आणि का राखली पाहिजे ह्याची साक्ष ही झाडं देतात. प्रशस्त पटांगणावर मुलं खेळ खेळत टीम वर्क शिकतात, खिलाडूवृत्ती विकसित करतात. हातात माती घेऊन बघू शकतात, जीवशास्त्राच्या पुस्तकातील अनेक गोष्टी प्रत्यक्ष अनुभवू शकतात. आणि ह्या वातावरणात १० वर्ष वावरलेला विद्यार्थी पुढे निसर्गाचा स्नेही बनून राहतो. हा स्नेह जुळावा ह्यासाठी जे जे मुलांना देता येईल ते आम्ही इथे देतो.
रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन, यशवंत नगर, तळेगाव दाभाडे, पुणे ४१० ५०७.
© २०२२ रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन. सर्व हक्क आरक्षित.